लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते!
आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.
वि स खांडेकर.
आज आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या करणारा
आठवणीचा खजिना हरवलेल्या कविता या अॅपच्या रूपाने
आपल्या बरोबर शेअर करताना आम्हाला खूप आनंद होतोय
आम्ही या अॅप मध्ये जुन्या बालभारतीच्या कवितांचा आणि काही प्रसिद्ध
काही प्रसिद्ध गीतांचा आणि बडबड गीतांचा समावेश केला आहे.
या कवितांचा या संग्रहात समावेश करताना मुळ कवींचे नाव शोधण्याचा
आम्ही पुरेपुर प्रयत्न केला आहे.
माय मराठीचीच्या सेवेत या अॅप द्वारे आम्ही खारीचा वाटा उचलतो आहे.
जर या अॅप द्वारे आम्ही तुम्हाला तुमच्या शाळेच्या बाकांवर पुन्हा नेवू शकलो,
आणि आपल्या हरवलेला आठवणींना पुन्हा एकदा ताजे करू शकलो,
तर आमचा उद्देश सफल झाला असे आम्ही मानू.</br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br></br>